बापरे पुनः काळजी वाढली: बार्शी तालुक्यात शनिवारी 83 कोरोना बाधित रुग्ण सापडले; एकूण आकडा 2071
बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ सुरु झाली आहे शनिवार दि . २९ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात ८३ रुग्ण कोरोना बधित मिळाले आहे .

मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्ण कमी जास्त प्रमाणात आढळत होते तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण वाढले होते अश्यात गेल्या काही दिवसा पासुन रॅपीड अॅन्टीजन तपासणीचे प्रमाण वाढविल्याने पुन्हा एकदा मोठ्या संख्येंनी रुग्ण सापडत असल्याने कोरोनाविषयक चिंता वाढत आहे.
शहरात बाजार पेठेतील व्यापारी दुकानदार कामगार यांच्या तपासणीचे काम सुरु असुन यामध्ये अनेक व्यापारी कामगार कोरोना बाधित सापडत आहे.

आज प्राप्त अहवालात शहरातील ४२ स्वॅब व ४९३ अॅन्टीजन रॅपीड असे ५३५ जणांच्या तपासणी करण्यात आल्या आहे . त्यापैकी ४७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे . शहरात सर्वाधिक अलीपुर रोड ९ तर मिरगणे कॉम्पलेक्स ५, सोलापुर रोड ५,आगळगाव रोड ४, ढगे मळा ४, मनगिरे मळा ४,भवानी पेठ १, भोसले चौक १, गाडेगाव रोड ३,
खानापुर रोड १, सावळे गल्ली १, गवळे गल्ली ३, डमरे गल्ली १, रोडगा रस्ता २, शिवाजी नगर १, लोखंड गल्ली १, येडाई विहीर १, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ २, शिवाजी आखाडा २, बारबोले प्लॉट १, वाणी प्लॉट २, राऊत नगर परांडा रोड १ असे ५६ रग्ण बाधित सापडले आहेत.


तर ग्रामिण मध्ये वैराग २, धसपिंपळगाव १, उंबरगे २, नारी १ ,गोरमाळे २, बावी आ २ , शेलगाव व्हळे १, गौडगाव २, शिराळे १, कदम वस्ती १, देवगांव ४, धानोरे १, पांगरी १, उपळे दु २, काळेगाव १, तडवळे २, इर्लेवाडी १ असे २७ रुग्ण बाधित आढळले आहेत .
चौकट :
बार्शी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण माहीती
आजवर एकुण बाधित रुग्ण – २०७१
बरे झालेले एकूण रुग्ण – १६६०
उपचार सुरु असलेले रुग्ण – १६३
आजवर मयत एकुण संख्या – ८९
घरामध्ये विलगीकरण संख्या –१५९
चालु कंटनमेंट झोन – २२८