अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा म्हणाले , निर्लज्ज सरकार…वाचा सविस्तर-

0
224

ग्लोबल न्यूज : संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचं बिल फाडलं…निर्लज्ज सरकार…, असं भातखळकर म्हणाले.

यासोबत cmo चे आषाढी एकादशी च्या महापूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाकडे साकडं घालत आता चमत्कार दाखव माऊली,आपल्याकडे औषध नाही काही तोंडाला पट्टी बांधून कस जगायचं हे ट्विट रिट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांना टार्गेट केले आहे.

भातखळकर यांनी यात म्हटलं आहे की,
कोरोना संकट निवारण्यासाठी चमत्कार दाखवण्याचे हतबल मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे… निदान कोरोनावर औषध शोधण्याच्या मानवी प्रयत्नांच्या यश दे असं तरी साकडं घालायचं होतं पांडुरंगाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here