बार्शी-सोलापूर रोडवर एसटीबस पेटवून देण्याचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत जमावाने केले कृत्य

0
4207

बार्शी : सोलापूरहून बार्शीकडे येत असलेल्या प्रवाशांनी भरलेली एसटी बस पानगावजवळ अज्ञात जमावाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मागील बाजूचे टायर थोडे जळाले. बसचे चालक-वाहक आणि प्रवाशांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे हल्लेखोर घाबरले आणि पळून गेले. बसमध्ये 45 प्रवाशी होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हल्लेखोरांनी जळते टायर बसच्या डिझेल टाकीजवळ टाकण्याचा प्रयत्न केला होता. टाकीतील डिझेलने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता मात्र प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरु होती.

सायंकाळच्या सुमारास सोलापूर-बार्शी ही बस (क्र. एमएच 13 बीटी 0503) सोलापूरहून निघाली होती. ती साडे सहाच्या सुमारास पानगाव ओलांडून बार्शीकडे येत होते. पानगावपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या झोटींगबाबा मंदिराच्या कमानीपासून पुढे जात असताना अचानक 10 ते 15 तरुण मुलांचा समावेश असलेला जमाव बस समोर आला. या मुलांच्या हातात फलक होते, तसेच ते ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत होते. त्यांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र नेमके काय घडत आहे हे न समजल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी खाली उतरण्यास नकार दिला.


बसवर दरोडा पडत आहे, अशी प्रारंभी प्रवाशांची समजूत झाली होती. चालक-वाहकांनी त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र या जमावाने मागील टायर पेटविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात टायर थोडे जळाले. टायरजवळच बसची इंधन टाकी होती. मात्र सुदैवाने तिथपर्यंत आग पेाहचली नाही. जमाव पळून गेल्यानंतर लोकांनी बस खाली उतरुन आग विझवली. प्रवाशांनी याबाबत बार्शी आगाराला फोन केल्यानंतर सहाय्यक वाहतूक अधीक्षक मसाळ या कर्मचाऱ्यासमवेत तिथे पोहचल्या. त्यांनी प्रवाशांना दुसर्‍या बसमधून बार्शीस पाठविले. तालुका पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहचले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here