पंढरपूरात घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू , तीन महिला, दोन पुरुष व एका मुलाचा समावेश
पंढरपूर : सततच्या पावसाने येथील चंद्रभागा नदीकाठी कुंभार घाटा लगत नव्यानं बांधण्यात येत असलेल्या घाटाची भिंत बुधवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

या दुर्घटनेत मंगेश गोपाळ अभंगराव (वय वर्षे 35), राधाबाई गोपाळ अभंगराव- (वय वर्षे -50), पिलू उमेश जगताप (वय वर्षे 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय वर्षे 70 ) व दोन महिला वारकरी अंदाजे वय वर्षे 60 वर्षाच्या यांचा मृत्यू झाला आहे. ( वारकरी महिलांची नावे समजली नाहीत). यात तीन महिला, दोन पुरुष व एका मुलाचा समावेश आहे.

दुपारी अडीच सुमारास ही घटना घडली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत होती. येथून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
याची घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले होते. कुंभार घाटा जवळ नवीन घाटाचे काम सुरू आहे.