भाजपाच्या नेत्यांना खाजगीत विचारा ते हेच सांगतील – रोहित पवार

0
192

भाजपाच्या नेत्यांना खाजगीत विचारा ते हेच सांगतील – रोहित पवार

कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी मध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजपा सरकारच्या काळात एका व्यक्तीची फक्त मत्तेदारी होती. भाजपाच्या नेत्यांना खाजगीत विचार तेही तुम्हाला हेच सांगतील असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी भाजपाला हाणला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरमध्ये आलेल्या रोहित पवार यांना पत्रकारांनी आघाडीत असलेल्या मतभेदाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवारांनी आपले माता मांडले होते. ‘भाजपकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत.

त्यामुळे समन्वयाबद्दल बोलले जातं आहे. पण त्याला काही अर्थ नाही. भाजपचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत. आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही असे सुद्धा बोलून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here