अशोक बोधले महाराज यांचे कोरोनामुळे निधन
बार्शी: माजी मंत्री दिलीप सोपल यांचे सहकारी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले शरद फलोत्पादन संघाचे माजी चेअरमन अशोक विश्वभंर बोधले -चारेकर यांच्या कोरोना आजाराने निधन झाले.त्यांच्यावर बार्शीतील मोक्षधाम मध्ये कोरोना नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे वय 72 वर्ष होते.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


बोधले चेअरमन असताना शरद फलोद्यान च्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोट ची कामे करण्यात आली होती. बार्शी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष, बार्शी बाजार समिती व दिलीप अर्बन बँकेचे संचालक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.त्यांच्या पश्चात ऍड दीपक आणि किरण ही दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.