बंडगार्डनचा विसर्ग वाढला,उजनीला होणार फायदा ; शंभरीकडे वाटचाल सुरू
पंढरपूर- मुळा मुठा साखळी धरणं व मुळशी परिसरात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला व मुळशी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा 15 हजार क्युसेकपर्यंत पोहोचल्याने याचा फायदा आता उजनीला होर्इल. दौंडची आवक वाढण्यास सुरूवात होर्इल. उजनी प्रकल्प टक्केवारीच्या शंभरीकडे वाटचाल करून सध्या तो उपयुक्त पातळीत 93 टक्क्याच्या उंबरठ्यावर आहे.

मागील चार दिवसात भीमा खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वरील धरणातून सोडण्यात येणा विसर्ग कमी करण्यात आले होते. मात्र मागील चोवीस तासात मुळशी धरणावर 54 मि.मी. तर टेमघर,वरसगाव पानशेतवर ही पर्जन्यराजाने हजेरी लावल्याने साखळी धरणांमधून विसर्ग सुरू केल्याने खडकवासला प्रकल्पातून सकाळी 9 हजार 400 क्युसेक पाणी सोडले जात होते ते दुपारी कमी करून 5 हजार क्युसेक करण्यात आले आहे.
याच बरोबर मुळशी शंभर टक्के भरले असल्याने यातून सकाळी 6500 क्युसेक पाणी सोडले जात होते. नंतर हा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे. पुणे बंडगार्डनचा विसर्ग सकाळी 16 हजार क्युसेकच्या आसपास पोहोचला होता. दौंडचा विसर्ग 4 हजार क्युसेक इतका कमी झाला आहे. यात आता वाढ होण्यास सुरूवात होर्इल. दरम्यान शंभर टक्के भरलेल्या कलमोडी व आंध्रा प्रकल्पातून मिळून आठशे क्युसेक पाणी सोडले जात आहे.

कोरोना डॉक्टर : योद्धा की लुटारू? वाचा सविस्तर-
वीरमधून 5 हजार क्युसेचा विसर्ग
नीरा खोऱ्यातील गुंजवणी,देवघर व भाटघर प्रकल्पावर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शंभर टक्के भरलेल्या या प्रकल्पांमधून नदीत पाणी पुढे सोडले जात असल्याने वीरमधून 5 हजार 237 क्युसेक पाणी सोडले जात आहे.नीरा खोऱ्यातील सर्व प्रकल्प क्षमतेने भरले आहेत.