अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत तब्बल 3 लाख 95 हजाराच्या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा माल जप्त
सोलापूर: पोलीस विभाग व अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये सोलापूर शहरातील निराळे वस्तीतील नागेश पांडुरंग सुरवसे रा. महादेव गल्ली, निराळे वस्ती, सोलापूर यांच्याकडून विविध कंपनीचे सुगंधित तंबाखू व पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण एकत्रित किंमत रुपये 3,95,417/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी श्रीमती पाटील यांनी पुढील कारवाई घेऊन संबंधित साठा मालक नागेश सुरवसे व राजन वसंत बंडगर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियम शिक्षापात्र कलम ५९ व भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८, १८८, २७२, २७३ नुसार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.


तसेच श्री उमेश भुसे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे स.पो. नि. खरात यांच्या समवेत मु. पोस्ट देगाव, ता पंढरपूर येथील किराणा व पानशॉप यांच्या एकूण 10 आस्थापणाच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. तथापि सदर आस्थापनेमध्ये प्रतिबांधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आलेला नाही.
सदरची दोन्ही ठिकाणावरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील व श्री उमेश भुसे तसेच पोलीस विभागातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, पोह/५० दिलीप भालशंकर, पोना/४५० योगेश बरडे, पोना/६६८ वाजीद पटेल, पोशि/ १५४२ संजय साळुंखे यांच्या पथकाने पुर्ण केली.