खामगावच्या आर्यन शुगरचा ताबा येडेश्वरी कारखान्याकडे यंदाच्या वर्षीच गाळप सुरू करणार-बजरंग सोनवणे
बार्शी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली सोय
बार्शी – खामगांव येथील आर्यन शुगर्स बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्स लि.समुहाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेकडून विकत घेतला आज बँकेकडून कारखाना हस्तांतरित प्रकिया पार पडली. येडेश्वरी साखर कारखाना युनिट- 2 या नावाने हा साखर कारखान सुरू होणार असून यंदाच्या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्याचा सोनवणे यांचा निर्धार आहे.

येडेश्वरी अॅग्रो प्राॅडक्ट्सचे प्रमुख बजरंग सोनवणे यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे प्रशासन प्रमुख रावसाहेब जाधव (काका कानकाञे) यांनी कारखानास्थळी प्रत्यक्ष ताबा व ताबापञ दिले.सोलापूर जिल्हा बँकेची दीर्घ काळापासून असलेली थकबकी तातडीने बसुली करण्यासाठी
प्रशासक श्री. शैलेश कोतमिरे स्विकारलेल्या धोरणा अंतर्गत मे. आर्यन शुगर्स लि. कडील थकीत
रक्कम धडक बसुलीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कारखाना मालमत्ता हस्तांतर करण्यासाठी बँकेतर्फे,
विलास देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, आर. एन. जाधव, प्राधिकृत अधिकारी,एम. सी. दुलंगे विभाग प्रमुख बिगरशेती कर्ज विभाग प्रमुख संतोष वरपे ज्युनि. ऑफिसर व इतर अधिकारी उपस्थित होते, तर मे येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्टस् तर्फे चेअरमन बजरंग सोनवणे संचालक नामदेव खराडे,श्रीधर भंवर, बाळासाहेब भंवर, सौरव सोनवणे, किरण मुळे, उद्योजक संतोष ठोंबरे, निळकंठ शेळके,शहाजी फुरडे पाटील उपस्थित होते.

आर्यन शुगर्स लि. कडे दिर्घ काळापासूनची थकबाकी वसुल झाल्याने सोलापूर जिल्हयातील सहकार
क्षेत्रात समाधानाचे वातावरण असून सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते या कामगिरीबाबत बँकेच्या या निर्णयाचे
स्वागत करीत आहेत. यापुढेही सहकारी संस्था तसेच शेती कर्जाची दिर्घ काळपासूनची थकित वसुली याच
धर्तीवर धडक योजनेव्दारे करुन बँकेचा संचित तोटा भरून काढण्यासाठी बँक व्यवस्थापनाने कंबर कसली
आहे.ताबा मिळताच कारखाना सुरु करण्याचे दृष्टीने आज कामकाज ही सुरू करण्यात आले.

बार्शी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय झाली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बार्शी तालुक्यातील खामगाव येथील आर्यन शुगर्स
लि. या खाजगी कारखान्याकडे मोठया प्रमाणावर मांडवली कर्ज थकित होते. सदरची थकबाकी वसुलीसाठी
बँकेने सरफेसी २००२ कायद्या अंतर्गत मागविलेल्या जाहीर निविदामध्ये येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्टस् लि.
आनंदगाव ता. केज जि.बिड या कंपनीची अधिकतम रु. ६८,६४,६६,०००/- इतक्या रक्कमेची निविदा
मालमत्तेच्या राखीव किंमतीपेक्षा जास्त असल्याने बँकेने सदर कारखान्याची विक्री येडेश्वरी अंग्रो
प्रोडक्टस् लि.आनंदगाव या कंपनीस शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी करून आर्यन शुगर्स लि.या
कारखान्याची बँकेकडे गहाणात असलेल्या मालमत्तेचा ताबा मे येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्टस् लि. आनंदगाव यांना
दिला.