तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल ?
सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अडीज तास मुलाखत घेतली या मुलाखतीत पवारांना कोरोना, राज्यात तीन पक्षांचे सरकार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत अनेक गैरस्फोटाचे प्रश्न राऊतांनी विचारले आहे.


यावर शरद पवार यांनी चोखपणे उत्तरे दिली. यावेळी तुम्ही आघाडी सरकारचे हेड मास्टर आहात की रिमोट कंट्रोल असा प्रश्न राऊतांनी विचारला असता शरद पवार यांनी आपण या दोघांपैकी काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अशा गोष्टी लोकशाहीत नसतात असे सुद्धा पवारांनी बोलून दाखविले.
यावेळी शरद पवारांनी लॉकडाऊन मध्ये अनुभवलेला काळही या मुलाखतीत सांगितला. “मी सुरवातीला दीड महिना अक्षरशः माझ्या घरातच बसून होतो. कुठेही बाहेर गेलो नव्हतो. चौकटीच्या आताच होतो. एक तर घरातून दबाव होता. सर्व तज्ज्ञांनी ७० ते ८० वयोगटातील सर्वांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे आणि या गटातील सर्वांना जास्त धोका आहे असे बोलले जात होते.