सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदी बार्शीच्या ऍड सुप्रिया गुंड पाटील

0
14

सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदी बार्शी च्या ऍड सुप्रिया गुंड पाटील यांची नियुक्ती

बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला सोलापुर जिल्हा अध्यक्षपदी ऍड सुप्रिया गुंड – पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे समारंभपूर्वक हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,खा सुप्रिया सुळे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष खा. फौजिया खान याना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी , पक्ष बळकटीकरण ,पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ऍड सुप्रिया गुंड – पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

खा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सोलापुर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबुत होणेसाठी आता महिला सेल देखील आघाडीवर असेल कारण उच्च शिक्षीत परंतु तळागाळात काम करणारा चेहरा जिल्हाध्यक्ष म्हणून लाभला आहे.

https://www.facebook.com/177300259309608/posts/1487572288282392/

पक्षाने दाखवलेला विश्वास सर्वांना सोबत घेऊन जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मजबुत पक्ष बळकटीकरण बांधणी आणि करून सार्थ करून दाखवु असा विश्वास नूतन अध्यक्ष सुप्रिया गुंड यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे , निरीक्षक दीपाली पांढरे ,जिल्हाध्यक्ष बळीराम साठे ,कार्याध्यक्ष उमेश पाटील, आ बबनदादा शिंदे, आ संजय शिंदे, आ यशवंत माने, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील ,माजी आ राजन पाटील, निरंजन भुमकर आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here