मराठी चित्रपट सृष्टीला आणखी एक धक्का: मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या

0
185

मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची नांदेडमध्ये आत्महत्या

नांदेड| मराठी चित्रपट अभिनेता आशुतोष भाकरे यांनी आज नांदेड शहरातील गणेशनगर भागाता गळफास घेवून आत्महत्या केली आहे. प्रसिध्द मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख सोबत आशुतोष भाकरे यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


नांदेड जिल्ह्याचे भुमिपूत्र आशुतोष भाकरे (३२) यांनी आपल्या शिक्षणानंतर मराठी सिनेश्रेष्ठीत प्रवेश केला. मराठी मालिका

खुलता कळी खुलेना या मालिकेमुळे प्रसिध्दीस आलेल्या मयुरी देशमुख सोबत आशुतोष भाकरे यांनी २१ जानेवारी २०१६ रोजी विवाह केला होता. विवाहनंतर आशुतोष भाकरे यांनी सुध्दा भाकर आणि ईच्चार ठरला पक्का हे आपले दोन चित्रपट केले होते.

मीडिया रिपोर्टनुसार आशुतोष भाकरे हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. अलीकडेच आशुतोषने आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की एखादी व्यक्ती आत्महत्या का करते?

आज दुपारी १ वाजेच्यासुमारास शहरातील गणेशनगर भागात त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल केला असून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here