बार्शी शहर तालुक्यात आणखी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले ; तालुक्यात पॉझिटिव्ह संख्या झाली १२०
बार्शी :बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी ९ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यानी प्रसिद्ध केलेल्या अहवालपैकी ७ जण कोरोना संसर्गाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलयाने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराट आहे.

बार्शी शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असुन यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ होत असुन रुग्णांमुळे नव्याने गावांचा समावेश होवु लागला आहे .

आज जिल्हा प्रशासनाच्या आलेल्या अहवालात बार्शी तालुक्यातील १२ स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला यामध्ये बार्शी शहरातील सुभाष नगर – १, भवानी पेठ -१, तानाजी चौक -१ असे तीन तर वैराग येथील गांधी चौकात – २ व घाणेगाव -१ रुग्ण सापडले आहे .तर सासुरे येथे पहिला रुग्ण सापडल्याने सासुरे गावात भीतीचे वातावरण होते.

अद्याप बार्शी तालुक्यातील २१० अहवाल प्रलंबित असुन या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .