आनंद वार्ता: कोरोना औषध ,१० कोटी गरिबांना लस देण्यासाठी बिल गेट्स यांचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार

0
482

आनंद वार्ता: कोरोना औषध ,१० कोटी गरिबांना लस देण्यासाठी बिल गेट्स यांचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार

पुणे, 07 ऑगस्ट : लवकरात लवकर कोरोना लस (Corona vaccine) तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आणखी एक पाऊल उचललं आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सीरम इन्स्टिट्युट, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लशीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन सीरम इन्स्टिट्युटने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, जगातील दानशूर व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या बिल गेट्स यांनीही आपल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्यावतीने कोरोनाविरोधातील लढाईत गोरगरीबांना लस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. बिल गेट्स यांच्या या संस्थेने सीरम इंस्टीट्युटसोबत कोरोनावरील लसीसाठी मोठा करार केला असून, या करारामुळे गरीबांना कोरोनावरील लस उपलब्ध होणे शक्य होणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर्श पूनावाला म्हणाले, कोविड -19 विरूद्धचा आपला लढा मजबूत करण्याच्या प्रयत्नातून सीरम संस्थेने भारत आणि निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी कोविड -19 लस सुरू केल्या आहेत. 10 कोटी डोस तयार करण्यासाठी गवी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनबरोबर युती केली आहे. ”

भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सेक्रेटरी रेणु स्वरूप म्हणाल्या, “सीरम संस्थेच्या कोविड -19 द्वारा सादर केलेल्या जागतिक आरोग्य संकटाला उत्तर देण्यासाठी ही जागतिक भागीदारी पाहून आम्हाला खूप आनंद झाला.” ते म्हणाले की, भारत केवळ इतकेच नाही प्रभावी आणि परवडणारी प्रभावी लस तयार करण्याचे भारतातील रेकॉर्ड आहे, परंतु ते जगासाठीदेखील आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here