सोलापुर ग्रामीण जिल्ह्यात गुरुवारी 154 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; सहा जणांचा मृत्यू

0
319

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरुवारी ग्रामीण भागातील तब्बल 154 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये 106 पुरुष तर 48 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 189 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1198 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1044 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 402 इतकी झाली आहे. यामध्ये 6 हजार 340 पुरुष तर 4 हजार 62 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 299 जणांचा मृत्यू झाला आहे यात 206 पुरुष तर 93 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 837 आहे .

यामध्ये 1 हजार 914 पुरुष तर 923 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 7 हजार 266 यामध्ये 4220 पुरुष तर 3046 महिलांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here