उस्मानाबाद, दि. 01 :जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून शासकीय वैदयकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 450 स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून उस्मानाबाद जिहयात आज शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी 123 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.


यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 44, तुळजापूर 16, उमरगा 32, कळंब 12, परंडा 12, भूम 5 व वाशी तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 1283 वर पोहचली आहे. यापैकी 516 रुग्ण बरे होवून घरी परतले असून 713 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 54 जणांची मृत्यू झाला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
