बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालये झाली पुर्ववत सुरु

0
48

बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालये झाली पुर्ववत सुरु

बार्शी प्रतिनिधी -मुंबई उच्च न्यायालयच्या आदेशानुसार कोरोना महाभयंकर विषाणूं आजारामुळे महाराष्ट्रातील सर्व न्यायालये गेल्या दीड वर्षांपासून बंद होते. मुंबई उच्च न्यायालयाने सुधारित आदेश काढीत महाराष्ट्रातील सर्व न्यायालयांचे कामकाज पुर्वरत करण्याचे आदेश काढले असून या आदेशाची प्रत सोलापूर येथील मुख्य न्यायमुर्तींना यांना प्राप्त होताच त्यांनी बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालय यांना पूर्ण वेळेनुसार न्यायालयाचे कामकाज उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या नियम व अटींनुसार चालू ठेवावे असे लेखी पत्राद्वारे कळविले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


त्यानुसार दि. 7 सप्टेंबर पासून बार्शी न्यायालयाचे कामकाज पुर्ण वेळेत सुरु होवून सर्व प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणामध्ये पक्षकारांना मे. कोर्टात हजर राहण्यास परवानगी देवून सुनावणीचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी बार्शी न्यायालयाच्या दुपार सुट्टीच्या वेळेत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायमुर्ती तेजवंतसिंग संधू यांनी मध्यस्ती जनजागरण अभियान अंतर्गत बार्शी वकिल संघामध्ये अॅड.एम.पी.धस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये मध्यस्थांची भूमिका,कर्तव्य या विषयावर मार्गदर्शनपर भाषण देत पक्षकारांनी त्यांची भांडणे आपापसात सामोपचाराने मिटविल्यास त्यांचा अनमोल वेळ,पैसा वाचून त्यांचे भावी आयुष्य आनंदी राहते हे पटवून दिले त्यामुळे पक्षकारांची आपापसातील भांडणे समोरच्याने मिटविण्यासाठी मध्यस्थी म्हणून वकिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण वकिलावर त्यांच्या पक्षकारांच्या विश्वास असतो त्यामुळे भांडणे त्वरित मिळतात त्यामुळे समाजात आनंदी वातावरण तयार होते व गावाचा विकास होऊन देशाचा विकास होतो त्यामुळे मध्यस्थांची व वकिलाची भूमिका समाजाच्या व देशाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे हे त्यांनी यावेळी पटवून दिले मध्यस्थी जनजागरण अभियानावर बार्शी वकिल संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अनिल पाटील,अॅड वैद्य, अॅड. शिला क्षिरसागर, अॅड. तिकटे यांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली.


कार्यक्रमास अॅड.भारत मुळे, अॅड. एस.एस. ठोंबरे, अॅड. किशोर करडे, अॅड. खुपसरे, अॅड. जाधवर तसेच महिला सदस्या व वकील सदस्य आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.ननवरे यांनी केले तर आभार अॅड.साखरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here