बार्शीकरांसाठी धोक्याची घंटा ; बार्शी शहरात 61 तर ग्रामीण भागात आढळले 5 कोरोना बाधित रुग्ण

0
442

बार्शीकरांसाठी धोक्याची घंटा ; बार्शी शहरात 61 तर ग्रामीण भागात  आढळले  5 कोरोना बाधित रुग्ण

आज एकुण ६६ रुग्णांची वाढ

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एकुण बाधित रुग्ण संख्या ९४९ 

एकुण मयत संख्या ३२

बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६६ ने वाढ झाली असून त्यामधील ६१ शहरामधील आहेत तर ग्रामिणमध्ये ६ रुग्ण आढळले आहेत त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ९४९ वर पोहचली आहे. बार्शी तालुक्याने दुर्दैवाने कोरोना अहवालात जिल्ह्यातील दहा तालुक्यांना मागे टाकले आहे.

बार्शी शहर व तालुक्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस परिस्थीती बिकट होत चालली आहे एकुण बाधित  ९४९  रुग्णापैकी शहरामधील रुग्ण ५३३ असून ग्रामीण मधील ४१६ आहेत. यातील दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ही ४७८वर गेली असून त्यापैकी शहरातील २४१ तर ग्रामीणमधील २३७ आहेत. शहरमध्ये एकूण १५आणि ग्रामीण मध्ये १७ असे एकूण ३२ रुग्ण मयत झाले आहेत. बार्शी शहरामध्ये शुक्रवारी ६१ रुग्णांची वाढ झाली असून त्यामानाने ग्रामीण मध्ये फक्त ५ रुग्णच वाढले आहेत.

आज प्राप्त झालेल्या एकूण १०९अहवालांपैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच ६६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यासाठी धोक्याची घंटा आहे. पंधरा दिवसाचे लॉकडाऊन आणि त्यासोबतच शहराच्या मध्यवर्ती भागात घोषित करण्यात आलेले प्रतिबंधात्मक क्षेत्र यामुळे शहरातील नागरिकांत मोठा रोष निर्माण झालेला असतानाच शहरात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.


आजपर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या अनुषंगाने शहरामध्ये एकूण १३८ प्रतिबंधात्मक क्षेत्र तर ग्रामीण मध्ये ५२ तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रांवर पोलिस आणि नगरपालिका व ग्रामपंचायतीच्यावतीने करडी नजर ठेवली जात असून विनाकारण क्षेत्राबाहेर फिरणार्‍या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

आज शहरात आढळले ६१ रुग्ण
नाळे प्लॉट- ५ झाडबुके मैदान -९ लहुजी चौक- ७ सुभाष नगर – २ वाणी प्लॉट – ३ आडवा रस्ता ५ म्हाडा कॉलनी १ भवानी पेठ ३ आशा टॉकीज रोड ७ मंगळवार पेठ ३ मनगिरे मळा ६ भिम नगर -१ कसबा पेठ -१ मार्केटयार्ड ४  रामभाऊपवार चौक -१ रोडगा रस्ता १ कासारवाडी रोड -१ सावळे चाळ -१ असे एकुण ६१ अहवाल पॉझिटिव्ह आले.


ग्रामिण मध्ये आढळले ५ रुग्ण
वैराग -२ आगळगाव -१ सासुरे -१  रुई -१ असे ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here