खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनानंतर ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतून मोठा प्रतिसाद

0
235

खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनानंतर ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतून मोठा प्रतिसाद

कोरोनाच्या वाढत्या संकटावर मात करत जगापुढे ‘धारावी पॅटर्न’चा नवा आदर्श ठेवणारे धारावीकर आता संपूर्ण मुंबईला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने धारावीच्या ‘कामराज मेमोरियल शाळे’त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना ला धारावीतील कोरोनामुक्त नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मुंबईकरांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या अभियानातील प्राथमिक चाचणीतील निकषांमध्ये पात्र ठरणारे दाते येत्या 27 जुलै ला प्लाझ्मा दान करणार आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी, कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली.

खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी अनुकूलता दर्शविली. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत यातील सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी शुक्रवारी धारावीत खासदार शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या दात्यांमध्ये धारावीतील नागरिक, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स आणि शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश होता.


यावेळी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. अनिल पाचनेकर, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका मरिअम्मल मुत्तु तेवर, धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. : कोरोना संक्रमणावर मात करत जगापुढे ‘धारावी पॅटर्न’चा नवा आदर्श ठेवणारे धारावीकर आता संपूर्ण मुंबईला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने धारावीच्या ‘कामराज मेमोरियल शाळे’त आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियाना’ला धारावीतील कोरोनामुक्त नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मुंबईकरांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या अभियानातील प्राथमिक चाचणीतील निकषांमध्ये पात्र ठरणारे दाते येत्या 27 जुलै ला प्लाझ्मा दान करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here