बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड जीवनदत्त आरगडे तर तालुकाध्यक्षपदी तानाजी जगदाळे

0
199

बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवनदत्त आरगडे तर तालुकाध्यक्षपदी तानाजी जगदाळे

बार्शी – बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवनदत्त आरगडे यांची फेरनिवड तर तालुका अध्यक्ष पदी चारे येथील तानाजी जगदाळे यांची निवड करण्यात आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. त्यात या निवडी करण्यात आल्या.

मागील काही वर्षापासून काँग्रेसच्या माध्यमातून स्वयंचलित घंटानाद आंदोलन, बुड बुड घागरी आंदोलन, तसेच विविध धरणे उपोषणे आंदोलने व विविध समाजोपयोगी कार्यक्रम उपक्रम अशा माध्यमातून अरगडे यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहोचण्याचे काम केले आहे. विविध विषयांवर आरगडे हे विविध माध्यमातून परखडपणे मते मांडतात त्यामुळे बार्शी तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आरगडे यांच्या नावाचे एक वेगळे वलय आणि आकर्षण आहे.तर तानाजी जगदाळे हे देखील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत असतात.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here