मराठा महासंघाच्या बार्शी तालुक्याध्यक्षपदी ऍड हर्षवर्धन पाटील

0
15

मराठा महासंघाच्या बार्शी तालुक्याध्यक्षपदी ऍड हर्षवर्धन पाटील

बार्शी – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी शिवराज्य सेनेचे संस्थापक आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक असलेल्या एड. हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर, तालुका उपाध्यक्षपदी आकाश श्रीधर चव्हाण यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर बार्शीसह तालुक्यातील विविध संघटना, आणि मित्र परिवाराकडून हर्षवर्धन यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हर्षवर्धन पाटील हे सामाजिक आणि विधायक कार्यात अग्रेसर असतात. शिवराज्य सेनेच्या माध्यमातून त्यांनी बार्शी तालुक्यात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. युवक संघटन घडवून तरुणाईला उद्योजक बनण्यासाठी प्रेरणादायी उपक्रमही त्यांनी घेतले आहेत. विशेष म्हणजे गावखेड्यातील तरुण उद्योग मित्रांच्या मदतीला जाऊन त्यांना उद्योगधंद्यात उभं करण्यासाठी पाठबळ देण्याचं काम त्यांनी केलं. आधी केले मग सांगितले, या वक्तीप्रमाणे हर्षवर्धन स्वत: उद्योजक आहेत, वकिली शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी उद्योजकीय वाटचालीस प्राधान्य दिले.

मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यातही ते सातत्याने अग्रेसर असतात. मराठा क्रांती मोर्चातही त्यांनी पुढाकार घेत मराठा युवकांसह बहुजन तरुणांईलाही एकत्र आणण्याचं काम केलं होतं. त्यांच्या या कार्याची दखल घेत मराठा महासंघाने त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here