मालाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबाला मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रत्येकी ४ लाख रुपयाची मदत….!
मालाड मालवणी येथे वरच्या इमारतीवर कोसळलेल्या भागामुळे झालेल्या दुर्घटनेबाबत पर्यावरण मंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी विचारपूस केली. आपघातग्रस्त कुटुंबाला सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश पालिका अधीकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली जाईल, असे जाहीर केले.


या दुर्घटनेमध्ये इतर १३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलीस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आले. घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. इतर सर्व १३ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आले.