सोलापूर ग्रामीण मध्ये 49 रुग्णांची भर; दोन मृत्यू,28 जण झाले बरे

0
270

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात आता महापालिका क्षेत्रानंतर ग्रामीण भागातील विविध गावात व नगरपालिका क्षेत्र मध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सोमवारी ग्रामीण भागातील 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये 27 पुरुष तर 22 महिलांचा समावेश होतो.तर 28 जण बरे झाले आहेत.यात पुरुष 21 तर 7 महिलांचा समावेश होतो.आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी टी जमादार यांनी दिली .

‘या’ गावांमध्ये सापडले नवे रुग्ण 
माळशिरसमध्ये एक, करमाळ्यातील सिध्दार्थ नगरात एक, सांगोल्यातील पुजारवाडीत एक, तर पंढरपुरातील झेंडे गल्ली, तुकाराम भवन येथे प्रत्येकी एक, रोहिदास चौकात तीन रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील बेलाटी व कोंडीत प्रत्येकी पाच, नान्नज येथे एक, मोहोळ तालुक्‍यातील चिंचोली काटीत दोन, येवतीत एक आणि दक्षिण सोलापुरातील कासेगाव, कंदलगाव, भंडारकवठे, आहेरवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णांची तर वळसंगमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अक्‍कलकोटमधील संजय नगर, खासबाग येथे प्रत्येकी एक, बार्शीतील व्हनकळस प्लॉट, भवानी पेठ, नाईकवाडी प्लॉट, सुभाष नगर, घोडके प्लॉट, कसबा पेठ, माळी गल्ली, रोडगा रस्ता, आगळगाव रोड, मुंगशी आर., काळेगाव, सौंदरे, बावी, सासुरे, घाणेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. वैरागमध्ये दोन, मांगाडे चाळ दोन असे एकूण 49 रुग्ण सोमवारी सापडले आहेत. 


आज दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे .यामध्ये उत्तर सोलापूर येथील कवठाळी येथील 67 वर्षांचे पुरुष 10 जुलै रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 12 जुलै रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला तर, पंढरपूर येथील 57 वर्षांचे पुरुष यांना 11 जुलै रोजी दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान 11 जुलै रोजी दुपारी चार वाजता त्यांचे निधन झाले या दोघांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

आज मयत नोंद झालेली व्यक्ती उत्तर सोलापूर येथील तिर्हे परिसरातील 73 वर्षाचे पुरुष असून त्यांना 27 जून रोजी रात्री यशोधरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सात जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांचे निधन झाले तर, दुसरी मयत नोंद झालेली व्यक्ती अक्कलकोट येथील बुधवार पेठ भागातील 65 वर्षांची महिला आहे त्यांना 25 जून रोजी सकाळी मार्कंडेय हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .9 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 899 इतकी झाली आहे. यामध्ये 576 पुरुष तर 323 महिला आहेत यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 28 पुरुष तर दहा महिलांचा समावेश होतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 493 आहे यामध्ये 322 पुरुष 171 महिलांचा समावेश होतो .आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 368 आहे यामध्ये 227 पुरुष तर 141 महिलांचा समावेश होतो.


Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here