बार्शी तालुक्यात २० पॉझिटिव्ह रुग्णांची भर; दोन मयत ,एकुण संख्या पोहचली – ८०२ वर
बार्शी तालुक्यात मंगळवार दि २८ रोजी आलेल्या अहवालात २० कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर दोन जण मयत झाले आहेत यामुळे तालुक्यातील कोरोनाचा आकडा ८०२ वर गेला आहे .

सोलापूर जिल्ह्यात गतीने कोरोना बाधित रुग्ण बार्शी तालुक्यात लॉकडाऊन काळातही रुग्णांची वाढ सुरुच आहे. यासह मयतांची संख्याही वाढत आहे. आज दि २८ रोजी आलेल्या अहवालात बार्शी शहरातील अलीपुर रोड येथे ६ बाधित रुग्ण आढळल्याने येथील परिसर कंटनमेंट झोल केला आहे .

तर भवानी पेठ २ भीम नगर १ ढगे मळा २ सिद्धेश्वर नगर असे आज शहरात १२ रुग्ण बाधित रुग्ण आढळले तर ग्रामिण मध्ये सर्वाधिक हळदुगे गावात ६ बाधित रुग्ण सापडल्याने गावात चिंतेचे वातावरण होते . तर यासह कासारवाडी १ सासुरे -१ असे ग्रामिण मध्ये ८ रुग्ण आढळले आहे असे शहर व ग्रामिण मिळुन २० बाधित रुग्ण सापडले आहेत .

तर आजच्या अहवालात सासुरे येथील ७१ वर्षीय व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे तर शहरातील सनगर गल्ली ६५ वर्षीय महिला उपचारादरम्यान मयत झाली अहवालही आज पॉझिटिव्ह आला आहे .यामुळे आता पर्यत एकुण मयताचा आकडा ३० वर पोहचला आहे . तर आतापर्यंत ४४५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.