बार्शीत मटका घेणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
85

बार्शीत मटका घेणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बार्शी: बेकायदेशीर पणे मटका घेणा-या एकावर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.

सुरेश बारंगुळे,वय 28 वर्षे रा. मंगळवारपेठ, बार्शी असे बेकायदेशीर पणे मटका घेताना पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश बांगर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकातील एस.एस. घोळवे, पी.एस.कारटकर असे बार्शी शहरामध्ये अवैध धंदयावर कारवाई करणेकामी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत करीत पांडे चौकात आले असता बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की नगरपालिकेच्या पाठीमागील बाजूस एक इसम अंदाजे येणारे अंक आकडयाची कल्याण नावाचा मटका जुगार खेळत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

पोलीस पथक पायी चालत बातमीतील नमुद ठिकाणी गेले असता, तेथे एक इसम खाली बसुन पांढरे कागदावर काही तरी आकडे मोड करीत असताना दिसला त्याचा जुगार गुन्हयाचे कामी संशय आल्याने त्यास जागीच पकडले. पकडलेल्या इसमाजवळुन जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पकडलेल्या इसमास सदरचा खेळ हा कोणाकडे देतो याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा खेळ हा अजिंक्य पिसे राहणार बाळेश्वर नाका, बार्शी यास देत असलेबाबत सांगितले आहे.बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here