बार्शीतील वडापाव दुकानदारावर कारवाई, 5 हजारांचा दंड

0
300

बार्शी – सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये शनिवार रोजी कडक लॉकडाऊन असताना शिवाजीनगर भागातील शिवाजी कॉलेज रोड वरील धुमाकूळ वडापाव सेंटर चालू असल्याने नगरपालिका दंडात्मक पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 5 हजार रुपये दंड वुसल करण्यात आलाय.


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नगर पालिकेचं पथक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास गेले होते. त्यामुळे, पथकाकडून मागण्यात येणारी 5000/- दंडाची पावती फाडून त्यांच्यावर पुढील होणारी कारवाई टाळण्यात आलेली आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये शनिवार सायंकाळपासून सर्व व्यवसाय धारकांनी अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने बंद ठेवली होती.

परंतु, कॉलेज रोडवरील अशोक हराळे यांचे धुमाकूळ वडापाव सेंटर चालू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित व्यापारावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची धडक कारवाई आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद, सुपरवायझर भोलेनाथ खलसे, जयपाल वाघमारे, अभय राज ओहोळ, विनोद लंकेश्वर या दंड पथकाने सदरची कारवाई केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here