बार्शीत सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई ; 800 किलो प्लॅस्टिक जप्त
बार्शी: केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचने नुसार बार्शी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत बार्शी शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई मोहीम सुरू आहे. या अंतर्गत शहरातील आनंद प्लास्टिक, खुशबू पान, योगेश प्लास्टिक यांचेवर दंडात्मक कारवाई करून आठशे किलो प्लस्टिक जप्त करण्यात आले.

सदर कारवाई मुख्य बाजारपेठ टाकणखार रोड याभागात करण्यात आली.संबंधितांकडून 12,000/- रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढेही प्लास्टिक वापरणाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांचेवर वेळप्रसंगी गुन्हेही दाखल करण्याची कारवाई नगरपरिषदमार्फत करण्यात येणार आहे. सदर कारवाई बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद, स्वच्छता निरीक्षक नितीन शेंडगे, हर्शल पवार, मुकादम नेमीनाथ पवार, सुपरवायझर अतिश रोकडे, आनंद कांबळे, सचिन सोनवणे, जयपाल वाघमारे, श्री कनिष्क शिंदे, अप्पा चौगुले, विनोद लंकेश्वर, उत्तरेश्वर अवघडे, दिपक कसबे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

कोट
नागरिकांनी व व्यवसायिकांनी बाजारपेठेमध्ये खरेदी अथवा विक्री करिता सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा अजिबात वापर करू नये त्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा.
शब्बीर वस्ताद आरोग्य विभाग प्रमुख