बार्शीत डीवायएसपी कार्यालयाकडून कोरोना नियम उल्लंघन करण्या-या हॉटेल आणि दुकानावर कारवाई

0
407

सोलापूर;कोरोना विषाणू प्रतिबंध उपाययोजनांचे उल्लंघन करण्या-यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या वतीने दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली.
सध्या संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणुना प्रार्दुभाव न होणे करीता राज्य शासनाने नो मास्क केसेस,सार्वजनिक ठिकाणी थुकणे व सोशल डिस्टसिंग पाळणे तसेच शनिवार
व रविवार रोजी अत्यावश्यक सेवा सोडुन सर्व आस्थापना बंद ठेवणे बाबत नियम घालण्यात आलेलेआहेत.

त्याचपध्दतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सोलापूर जिल्हयात कोरोना विषाणुचा प्रार्दुभावाला
प्रतिबंध करणेसाठी सार्वजनिक ठिकाणी चेह-याला कायम स्वरूपी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी
थुकणे व सोशल डिस्टसिंग न पाळणारे लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश तसेच शनिवार व रविवार दिवशी अत्यावश्यक सेवा सोडुन इतर चालु असणारे आस्थापना विरूध्द कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
सदर आदेशांचे अनुसरून पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शना खाली बार्शी उपविभागातील बार्शी शहर,बार्शी तालुका, वैराग पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उमेश रमेश वाघमारे रा.तावडी ता.बार्शी यांने बार्शी शहरातील नगर पालीके समोर ओजस्वी एंटरप्राईजेस मोबाईल सर्व्हिस सेंटर चे दुकान शनिवारी परवानगी नसतांनाचालु ठेवले. तसेच प्रभाकर रामभाउ चिपडे रा.सौंदरे ता.बार्शी यांनी आज रोजी अत्यावश्यक सेवा सोडुन तालुका सर्व आस्थापना बंद करणे बाबत आदेश असतांना त्यांनी सौदरे येथील त्यांचे हॉटेल सागर हे चालु ठेवले.

महादेव आगतराव मोरे रा.पानगांव यांनी अत्यावश्यक सेवा सोडुन सर्व आस्थापना बंद करणे बाबत आदेश असतांना त्यांनी पानंगांव येथील त्यांचे हॉटेल सागर हे चालु ठेवले.यश मोहन ताटे व त्रिंबक सौदागर मुसळे दोघे रा.मानेगांव ता.बार्शी
यांनी मानेगांव येथील एस टी स्टॅन्ड येथील दोन चहाचे कॅन्टींग चालु ठेवल्या.

वरील प्रमाणे कोरोनाच्या अनुषंगाने बार्शी उपविभागातील पोलीस ठाणे हददीत वरील इसमांनी जिल्हाधिकारी सोलापूर आदेशोंचे उल्लघंन केले आहे. म्हणुन त्यांचे विरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब व साथीचे रोग
प्रतिबंधक अधिनियम चे कलम २,३,४ व महा.कोव्हिड विनीमय चे कलम ११ प्रमाणे गुन्हे दाखल
केले आहे

बार्शी उपविभागातील सर्व पोलीस ठाणे हददीत राहणारे जनतेला आवाहन आहे की,कोरोना विषाणुनाचा प्रार्दुभाव न होणे करीता कृपया नेहमी मास्क चा वापर करावा.सार्वजनिक
ठिकाणी थंकु नये,तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंग पाळावी जेणे करून एकमेंका पासुनकोरोना चा विषाणुचा प्रसार कमी करण्यास यश येईल.तसेच मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या
आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशांचे पालन न झाल्यास
कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here