लग्नापूर्वी ५ तोळे सोने घेऊन ऐनवेळी लग्नाला दिला नकार; बार्शी तालुक्यातील प्रकार

0
122

वैराग : व्याह्याच्या दुसऱ्या मुलीचा विवाह आपल्या मुलाशी करण्याचे नक्की करुन, त्यासाठी पाच तोळ्याचे दागिने स्विकारले आणि ऐनवेळी लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार तांबेवाडी येथे घडला.

याबाबत आश्रमशाळातांडा येथे शिपाई म्हणून काम करणारे, लिंबाजी धर्मा चव्हाण (वय ५०), रा. तांबेवाडी, ता. बार्शी, यांनी वैराग पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, माझ्या मोठ्या मुलीचे सासरे नामदेव दगडू जाधव (व्याह्यी) यांनी त्यांचा लहान मुलगा आकाश याचे लग्न माझी दुसरी मुलगी मिनाक्षी हिचेसोबत जमवून, दि. २१ जुलै २०२१ रोजी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम केला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यावेळी आम्ही होणारे जावई आकाश नामदेव जाधव यांस एक तोळा वजनाच्या सोन्याच्या ३ अंगठ्या व व्याही नामदेव दगडू जाधव यांना २ तोळे सोन्याची चेन असे एकूण अडीच लाख रुपये किंमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने या कार्यक्रमात घातले.

त्यावेळी दि. १५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता लग्न करण्याची तारीख व वेळ ठरली होती. ठरल्यानुसार लग्न करण्यास त्यांनी आता नकार देवून, जमलेले लग्न मोडून, माझ्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी करुन, आर्थिक फसवणूक केली आहे.

म्हणून माझी नामदेव दगडू जाधव व आकाश नामदेव जाधव दोघे (रा. आश्रमशाळातांडा, तांबेवाडी, ता.बार्शी) यांचे विरुध्द तक्रार आहे. लिंबाजी धर्मा चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here