ते माझे मित्र, राजकीय द्वेशातून त्यांच्यावर कारवाई, मी त्यांच्या पाठीशी खंबीर – प्रवीण दरेकर
मुंबई:पंढरपुरातील तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांच्या कारखान्यांवर आय़कर विभागाने धाड टाकली. मात्र, हे सर्व राजकीय द्वेशापोटीसुरु असून अभिजीत पाटील लवकरच त्यातून सुटतील असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांंनी सांगितलं आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


तसेच, ते माझे मित्र आहेत, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असंही दरेकर म्हणाले. आज दरेकरांनी अभिजीत पाटलांची भेट घेतली.
तरुण उद्योजक अभिजीत पाटील ज्यांच्यावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरुये त्यांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट क्लिनचीट दिली आहे. ते माझे मित्र आहेत, ते यातून लवकरच बाहेर पडतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले. इतकंच नाही तर अभिजीत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.