मुंबई- मुंबईत आज दिनांक 16 रोजीरोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई, फोर्ट, गोवा स्ट्रीट, गणेश चाळ जवळ, लकी हाऊस समोर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मागे, कबुतर खाना येथील भानुशाली इमारत (तळ+५ / सदर इमारत ८० वर्ष जुनी आहे.) या इमारतीचा ४०% भाग कोसळला आहे.

घटनास्थळी एनडीआरएफचे जवान, मुंबई पोलिस अधिकारी, मुंबई अ. दलाचे ६-फायर वाहन, ३-जेसीबी, १-एलपी वाहन इत्यादीच्या साह्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या एकुण २३ रहिवास्यांना सुखरुप बाहेर काढले आहे.


तसेच सदर इमारतीलगत पार्किंग करण्यात आलेल्या काही वाहनांनचे नुकसान झाले आहे.सदर घटनेमध्ये २ रहिवास्यांचा मृत्यु झाला आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व एनडीआरएफ जवानांनकडून शोधकार्य सुरू आहे .

मुंबई अ. केंद्रातून मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड घटनास्थळी दाखल झाले आहेत.