बार्शी बसस्थानकावर 4 तोळे सोन्याचे दागिणे ठेवलेली पर्स पळवली

0
391

लग्नसमारंभ उरकुन परतणाऱ्या महिलेची बार्शी बसस्थानकावर दागिणे ठेवलेली पर्स पळवली

पर्समध्ये होते ४२ ग्रॅम वजनाचे दागिने

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी  प्रतिनिधी

बार्शी येथे लग्न समारंभ उरकून पुणे येथे जाण्यासाठी निघालेल्या बार्शी एसटी स्टँड वर बसमध्ये चढत असताना खांद्याला अडकवलेल्या पर्सची चैन उघडून पर्समध्ये सुमारे १ लाख नव्वद हजार रुपये किंमतीचे ४ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवलेले लहान पाकीट चोरून नेल्याची घटना दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.


याबाबत विद्या अविनाश देवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहीती की, फिर्यादी विद्या देवणे व पती अविनाश हे बार्शी येथे फिर्यादीचे दीर विवेकानंद देवने यांच्याकडे लग्न समारंभ कार्यक्रमासाठी आले होते . लग्न उरकून दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पुणे येथे जाण्यासाठी बार्शी बस स्थानकावर आले असता परळी ते पुणे एसटी बस लागली होती. त्यावेळी पती अविनाश हे बस मध्ये जागा पकडण्यासाठी पुढे गेले .

तर दागिने असलेली पर्स खांद्याला अडकून एसटी बस मध्ये गर्दी मधून वर चढून जागा पकडलेल्या शीटवर जाऊन बसले असता बसची चैन उघडी दिसली त्यामुळे लगेच पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चे लहान पाकिट पाहिले असतात ते दिसून आले नाही.

इकडे तिकडे पडले का याचा शोध घेतला असता दागिने ठेवले पाकीट मिळून आले नाही. या पाकिटामध्ये 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तर 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोहन माळ व त्याचे पेंडल असे सोन्याचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस संजय खैरे हे करीत आहेत .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here