बार्शी : राहत्या घरासमोर लावलेली मोटरसायकल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डोळ्यादेखत पळवून नेल्याची घटना बारंगुळे प्लॉट येथे घडली.
सलिम बाबा मुल्ला (वय ५३), रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी हे दि. २५ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास पत्नीसह हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, आणि घरासमोर गाडी लाऊन आतमध्ये गेले.
त्यानंतर गाडीचा आवाज आल्यामुळे बाहेर येऊन बघितले असता हिरो स्प्लेंडरप्लस मोटरसायकल क्र. एमएच-१३-एव्ही-०५४९ ही एक इसम चालू करुन घेऊन जात असलेला दिसला. त्यांनी व त्यांच्या मुलाने त्याचा पाठलाग केला, परंतु तो भरधाव वेगाने पसार झाला. आजूबाजूस त्याचा व मोटरसायकलचा शोध घेऊनही न आढळल्याने बार्शी शहर पोलिस ठाण्यात दि. २९ एप्रिल रोजी फिर्याद दिली, त्यावरुन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आत्तापर्यंत बार्शी शहरांतून १ फेब्रुवारीला मंगळवार पेठेतून बागवान, १० फेब्रुवारीला तेलगिरणी चौकातून होनाळे , २ मार्चला उपळाई रोडवरुन रामगुडे, १२ मार्चला देशपांडे वाडा येथून आंबेकर, ६ एप्रिल रोजी पाटील प्लॉट येथून जगदाळे, ९ एप्रिलला राजमाता नगर, उपळाई रोड येथून मुळे, २३ एप्रिलला खुरपे बोळ येथून नकाते, २५ एप्रिलला बारंगुळे प्लॉट येथून मुल्ला यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहेत.