बार्शी ;
भोगावती नदीपात्रातील वाळु बेकायदेशीर पणे टेम्पोत भरूण विक्री करण्यासाठी घेऊण जाणा-या टेम्पोचालकावर स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीण च्या पथकाने कारवाई केली.

सयाजी मारूती गाडेकर, वय 27 वर्षे, रा. पानगाव, ता. बार्शी असे याप्रकरणात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सहाय्यक फौजदार निलकंठ जाधवर, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोबत पोलीस उपनिरीक्षक, अमित पाटील, सहायक फौजदार शिवाजी घोळवे, पोहेक प्रकाश कारटकर, केशव पवार असे अवैध वाळूविषयी पेट्रोलिंग करीत उंडेगाव, ता. बार्शी गावचे शिवारात आले असता तेथे गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, उंडेगाव गावचे जवळून वाहणारे भोगावती नदीच्या पात्रातून अवैध रित्या, चोरून, विनापास परवाना वाळू काढून टेम्पो क्रमांक एम.एच. 04 डी.एस. 1080 यामधून भरून पानगाव कडे जात आहे.
त्यानंतर पथक रास्तापूर कडे जाणारे रस्त्याच्या अलिकडे सुमारे 500 मिटर अंतरावर थांबले. काही वेळात एक निळ्या रंगाचा टेम्पो क्रमांक एम.एच. 04 डी.एस. 1080 हा येत असल्याचे दिसून आले. त्याचा संशय आल्याने सदर टेम्पोच चालकास हात करून थांबण्याचा इशारा केला असता त्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबवला.टेम्पोचालकास सदर वाळूबाबत विचारणा केली असता त्याने सदरची वाळू ही भोगावती नदी पात्रातून भरून बार्शीकडे विक्री करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सदर वाळूची रयल्टी बाबात चौकशी केली असता ती नसलेचे सांगितले.

बार्शी तालुक्यातील वैराग,पानगाव,उंडेगाव भागातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुची चोरी होत असल्याचे बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या पोलीस कारवाई वरूण दिसुन येत आहे.
याप्रकरणात पथकाने टेम्पो ताब्यात घेऊन टेम्पोचालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.