गळ्यातील सोन्याची चैन चोरण्यासाठी ९ महिन्याच्या चिमुरड्याचा खून ; बार्शी तालुक्यातील वांगरवाडी येथे भर दिवसा घडली घटना
भरदिवसा घडलेल्या घटनेने उडाली खळबळ
अनोळखी इसमाने चोरीच्या बहाण्याने येऊन केला खुन
बार्शी : बार्शी तालुक्यातील वांगरवाडी येथे भरदिवसा घरामध्ये घुसून पाळण्यामध्ये झोपलेल्या नऊ महिन्याच्या चिमुरडयाचा मोबाईल चार्जर वायरने गळा आवळून खून केल्याची घटना शनिवार दि. २२ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत मयत सार्थक चे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे . सार्थक स्वानंद तुपे (वय ९ महिने )असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की यावेळी घटने दरम्यान मयत सार्थकची आई अश्विनी स्वानंद तुपे ही घरामध्ये दोघेच होते . तर सासू – सासरे शेतामध्ये गेले होते . मोठा मुलगा अर्णव घराबाहेर होता . तर सार्थक चे वडील स्वानंद तुपे हे ट्रक ड्रायव्हर असल्याने चार दिवसापूर्वी ट्रक घेऊन बाहेरगावी गेले आहे .अश्विनी या दुपारच्या सुमारास गेटच्या बाहेर वाळत टाकलेले कपडे घेऊन गेट न लावता घरात आल्या होत्या .

यानंतर सार्थक यास पाळण्यामध्ये झोपून त्या किचनमधे पीठ चाळत बसल्या होत्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक सार्थक याचा जोरात रडण्याचा आवाज आल्याने त्याच्याकडे जाऊन पाहिले असता एक अनोळखी इसम मोबाईल चार्जर वायरच्या साह्याने सार्थक याचा गळा आवळत होता . यावेळी अश्विनी हिने त्यास ‘ माझ्या मुलाला काही करू नकोस तुला काय घेऊन जायचे आहे ते घेऊन जा ‘ असे म्हणाल्या यावर तो अनोळखी इसम ‘ तू शांत बस नाहीतर तुझ्या मुलाला जीवे मारेल ‘असे बोलला .

यानंतर बाळाला वाचविण्यासाठी अश्वीनी गेल्या असता त्या इसमाशी झालेल्या झटापटीत इसमाने ढकलून दिले यात चिमुरड्याच्या आई अश्वीनी यांना दुखापत ही झाली तर त्या इसमाने पाळण्यातुन काढुन सार्थकला खाली टाकून दिले त्यावेळी तो रडला नाही त्यानंतर त्या अनोळखी इसमाने अश्वीनी यांचे पाय साडीने बांधले व ओरडु नये म्हणून तोंडात कापडाचा बोळा कोंबला त्यामुळे ओरडता आले नसल्याचे अश्विनी हिने म्हटले आहे . त्यानंतर त्याने घरातील कपाट उघडून व माझ्या गळ्यातील सुमारे १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र घेऊन घरासमोर असलेल्या मकाच्या शेतातून पळून गेला असल्याचे सांगितले .
दरम्यान त्या इसमाने पाळण्यातुन काढुन सार्थकला खाली टाकून दिले त्यावेळी तो रडला नाही त्यामुळे मोबाईल चार्जर वायरने गळा आवळल्याने तो मयत झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .
या ऐन गणेश चतुर्थी दिवशी सर्वजण गणपती
ची लगबग सुरु असताना बार्शी तालुक्यात वांगरवाडी येथे भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे बार्शी तालुका हादरला आहे हि हृदय पिळवुन टाकणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र नागरिकांतुन रोष व्यक्त होत आहे
ही घटना घडल्यानंतर तात्काळ बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे शिवाजी जायपत्रे आपल्या सहकारी पोलिसांसह गावात हजर झाले. तसेच यावेळी वांगरवाडी या गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे हेही गावात हजर झाले असून गावातील वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.घटनेचा पंचनामा करत सार्थकची प्रत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.