सोलापूर शहरात 88 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह 5 जणांचा मृत्यू; शहर आणि ग्रामीणचा एकूण आकडा 4 हजार पार

0
26

कोरोनाबाधितांचा आकडा जिल्ह्यात 4 हजार पार

सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4099 इतका झाला आहे तर एकूण मृतांची संख्या 339 पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 1650 जण कोरोनावर उपचार घेत आहेत तर 2110 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज एका दिवसात शहर आणि जिल्ह्यात मिळून 121 पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले तर मृत 7 आहेत.

सोलापूर शहरात आज 398 अहवाल प्राप्त झाले यात 310 निगेटिव्ह तर 88 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 49 पुरूष आणि 39 महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहरात आज 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सोलापूर शहरात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3249 झाली आहे तर मृतांची संख्या 303 वर पोहोचली आहे. शहरात 1176 जणांवर उपचार सुरू आहेत तर 1770 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 184 अहवाल प्राप्त झाले यात 151 निगेटिव्ह तर 33 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये आज 2 जणांची मृत म्हणून नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here