बार्शी तालुक्यासाठी 2 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या 84 विहीरी मंजूर – आमदार राजेंद्र राऊत

0
443

बार्शी तालुक्यासाठी  2 कोटी 52 लाख रुपये किंमतीच्या 84 विहीरी मंजूर —  आमदार राजेंद्र राऊत

                  
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2020 – 21 अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर या योजनेतून 2 कोटी 52 लाख  रूपये किंमतीच्या 84 विहीरी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


या योजनेचा लाभ तालुक्यातील चिखर्डे, मालवंडी, बाभुळगाव, हत्तीज, पिंपरी पा. सासुरे, यळंब, कुसळंब, बोरगांव झा, चिंचोली, उपळे दु. धामणगाव दु. कांदलगांव, कव्हे, नारी, तावडी, घाणेगांव, कासारी, पिंपळगाव धस, खडकलगांव, कोरफळे, रातंजन, गौडगांव, भातंबरे, भालगांव, पानगांव, सर्जापूर, सुर्डी, वैराग, वाणेवाडी, गुळपोळी, उंडेगांव, धोत्रे, बोरगांव खु.आगळगांव, तांबेवाडी  या गावांतील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.


 तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विहिरींना मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री  दत्तात्रय  भरणे यांचे आभार मानले. यावेळी पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, पं.स.उपसभापती मंजुळाताई वाघमोडे, माजी जि.प. सदस्य संतोष  निंबाळकर, जि.प.सदस्य मदन दराडे , किरण मोरे, समाधान डोईफोडे, पंचायत समिती सदस्य अविनाश मांजरे,  इंद्रजित चिकणे,  राजाभाऊ धोत्रे,  उमेश बारंगुळे, सुमंत गोरे आदी उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here