बार्शी तालुक्‍यात  शनिवारी  83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू

0
599

बार्शी तालुक्‍यात  शनिवारी  449 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना पॉझिटिव्ह 

बार्शी  : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याचा परिणाम तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा देखील वाढू लागला आहे. दररोज साधारणपणे 100 च्या सरासरीने रुग्ण संख्या वाढत आहे. गेल्या तीन दिवसात 268 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी दुपारी  532 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात 83 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात शहरातील 57 तर ग्रामीण मधील 26 असे रुग्ण असून बाधितांची संख्या 3 हजार 894  झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

 कोरोनामुक्त होऊन 2 हजार 660 जण घरी गेले आहेत. 131 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली. 

शहरातील 335  व ग्रामीणमधील 197 असे 532 अहवाल प्राप्त झाले आहे. शहरातील 436  व ग्रामीण मधील 116 असे 552 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 68 तर ग्रामीणमधील 63 अशा 131 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 147 तर ग्रामीणमध्ये 79 अशा  226  जणांवर उपचार सुरु आहेत. आजवर शहरात 2 हजार 376  तर ग्रामीण भागात 1 हजार 518  कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात शहरातील 1480 आणि ग्रामीण भागातील 1180 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

ग्रामीण भागात वैराग, कदमवस्ती,गौडगाव, चिखर्डे, ताडसौंदने, उंडेगाव, पिंपळगाव, आगळगाव, झाडी, मालवंडी, उपळाई व भातम्बरे या गावात तर शहरातील शिवाजीनगर, गाडेगाव रोड, मुल्ला प्लॉट,बळीराम नगर, भराडीया प्लॉट, सनगर गल्ली,अण्णाभाऊ साठे नगर, उपळाई रोड, हिरेमठ प्लॉट, गायकवाड प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, कसबा पेठ, कॅन्सर हॉस्पिटल, वाणी प्लॉट, सुभाष नगर, महेदवी नगर, मंगळवार पेठ, देशमुख प्लॉट, धर्माधिकारी प्लॉट, नलवडे प्लॉट, सोमवार पेठ, मनगिरे मळा, नागणे प्लॉट, राऊत चाळ, दत्त नगर, झाडबुके मैदान,टिळक चौक, रोडगा रस्ता या भागातील रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here