सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी (ता. 21) घेतलेल्या एक हजार दोन टेस्टमध्ये 64 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तो अहवाल बुधवारी (ता. 22) महापालिकेकडून देण्यात आला.

यात 34 पुरुष तर 30 महिलांचा समावेश होतो .आज 285 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 51 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.
4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक चार, पाच, सात, आठ, नऊ, 13, 15, 16, 18, 21, 24 आणि 26 या प्रभागांमध्ये रुग्णसंख्या दीडशेहून अधिक झाली आहे. शहरातील रुगणसंख्या आता चार हजार 52 झाली असून मृतांची संख्या 333 झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी दोन हजार 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एक हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मृत्यूची संख्या कमी होईल ही अपेक्षा अद्यापही फोल ठरली आहे.

होटगी रोडवरील अंबिका नगरात दोन, देगाव, स्वागत नगर, सिध्देश्वर नगर (नई जिंदगी), प्रेम नगर (जुळे सोलापूर), रेल्वे लाईन, शुक्रवार पेठ, भवानी पेठ, गांधी नगर (दक्षिण सदर बझार), देशमुख गल्ली (नवी पेठ), पापाराम नगर (विजयपूर रोड), एसआरपी कॅम्प, कुमठा नाका, मुमताज नगर, शुक्रवार पेठ, लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), आदित्य नगर, लिमयेवाडी, सिध्देश्वर पेठ, एकता नगर, भारतरत्न इंदिरा नगर, बालाजी सोसायटी (कुमठा नाका), काडादी नगर (होटगी रोड)
याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच सलगर वस्ती दोन, मल्लिकार्जुन नगरात चार, शेळगीतील माफणे अपार्टमेंटमध्ये सहा, शेळगी व भवानी पेठेत प्रत्येकी दोन, मंजुषा सोसायटीत (विकास नगर) सर्वाधिक दहा रुग्ण आढळले आहेत. तर गुलमोहर सोसायटी (वसंत विहार), बुधले गल्ली, स्वामी विवेकानंद नगर येथे प्रत्येकी दोन रुग्ण आणि गणेश नगरात (बाळे) येथे सात रुग्ण सापडले आहेत.
