सोलापूर: सोलापूर शहरा सोबत आता ग्रामीण जिल्ह्यातील विविध शहरे गाव पातळीवर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे .आज शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 61 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 45 पुरुष तर 16 महिलांचा समावेश होतो, तर आज पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार यांनी दिली.

या’ गावांमध्ये शुक्रवारी सापडले कोरोनाचे रुग्ण
मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी, माढा तालुक्यातील आकुंभे, रिधोरे, भोसरे, तर उत्तर सोलापुरातील एकरुख, हगलूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे., बनजगोळ, कल्लाप्पावाडी, दुधनी, समता नगर याठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत.
करमाळा तालुक्यातील जिंती, दक्षिण सोलापुरातील मुळेगाव तांडा, कुंभारी, होटगी, होटगी स्टेशन, मुळेगाव, हत्तूर, वांगी, बोळकवठा, नांदणी, उळे, नवी विडी घरकूल आणि बार्शी तालुक्यातील सबजेल तहसिल ऑफीस, नागणे प्लॉट, कसबा पेठ, उपळाई रोड, मंगळवार पेठ, वैराग, साकत पिंपरी याठिकाणीही रुग्ण सापडले आहेत.
–
तालुकानिहाय एकूण रुग्णसंख्या

तालुका एकूण रुग्ण
अक्कलकोट 84
बार्शी 81
करमाळा 04

माढा 11
माळशिरस 05
मंगळवेढा 00
मोहोळ 25
उत्तर सोलापूर 47
पंढरपूर 21
सांगोला 03
दक्षिण सोलापूर 196
एकूण 477