बार्शी तालुक्यात ६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर तिघांचा मृत्यू; एकूण आकडा झाला 782;आजवर 28 मृत्यू एकुण संख्या पोहचली – ७८२ वर

बार्शी: बार्शी तालुक्यात सोमवार दि २७ रोजी आलेल्या अहवालात ६ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर तीन जण मयत झाले आहेत यामुळे तालुक्यातील कोरोनाचा आकडा ७८२ वर गेला आहे .


सोलापूर जिल्ह्यात गतीने कोरोना बाधित रुग्ण बार्शी तालुक्यात वाढत आहे. तसेच मयतांची संख्याही वाढत आहे. आज दि २७ रोजी आलेल्या अहवालात बार्शी शहरात अलीपुर रोड २ मनगिरे मळा १ सिध्देश्वर नगर १ सुभाष नगर १ असे ५ तर ग्रामिण मध्ये धोत्रे गावात १ असे एकूण ६ बाधित रुग्णांची भर पडली आहे .

तर तेलगिरणी चौक येथील एक व नाईकवाडी प्लॉट येथील एक व्यक्ती मयत झाली आहे तर ग्रामिण मध्ये सर्जापुर येथील व्यक्ती मयत झाल्याने आजवर बार्शी तालुक्यात कोरोना मुळे मृत्युची संख्या २८ वर पोहचली आहे तर ४४५ रुग्ण बरे झाले आहेत