सोलापूर शहर हद्दीत रविवारी कोरोनाचे 54 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 32 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांची चार इतकी आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 91 इतकी आहे.

रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 432 जणांचे प्राप्त झाले. त्यामध्ये 378 जणांचे निगेटीव्ह तर 54 जणांचे पॉझिटीव्ह आले. चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 पुरुष व एका स्त्रीचा समावेश आहे. यशोधरा रुग्णालयमध्ये एक, शासकीय रुग्णालयात दोन, सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मयतांमधील एक व्यक्ती (पुरुष) सोरेगाव परिसरातील, दुसरी विडी घरकूल परिसरतील 80 वर्षांची महिला, तिसरी भवानी पेठ परिसरातील 57 वर्षांचे पुरुष तर चौघी व्यक्ती शेळगी रोड परिसरातील 70 वर्षीय पुरुष आहे.आज उपचार घेऊन बरे होऊन घरी जाणार्यांची आजची संख्या 91 इतकी आहे.

पॉझिटीव्ह आढळलेले म्हाडा कॉलनी (डी मार्टजवळ), सोरेगाव, न्यू पाच्छा पेठ, शुक्रवार पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, विशालनगर (जुळे सोलापूर’), आदित्यनगर, तेलेगनगर (लक्ष्मी पेठ), एसआरपी कँपजवळ, रमाबाई आंबेडकरनगर, समाधाननगर (अक्कलकोट रोड), ईएसआयएस क्वार्टर्स, मंगळवार पेठ, हत्तुरेवस्ती, प्रभाकर महाराज मंदिरजवळ, राहुलनगर (बाळे), देशमुखवस्ती (देगाव), भागवत चाळ, राघवेंद्र टॉवरजवळ (विजयनगर),

सिद्धेश्वरनगरजवळ (स्वागतनगर), स्वामीसमर्थनगर (जुळे सोलापूर), शेटेनगर (लक्ष्मी पेठ), दक्षिण सदर बझार लष्कर, तुकाराम अपार्टमेंट (रेल्वे लाईन), आसरा पुलाजवळ, हनुमान मंदिराजवळ, शंकरनगर, ओमनम:शिवायनगर, सेटलमेंट फ्री कॉलनी नं. 3, स्वामी विवेकानंदनगर (हुत्तरेवस्ती)

मित्रनगर, कुमारस्वामीनगर (शेळगी), अरविंद धाम पोलिस वसाहत, अवंतीनगर, उज्ज्वल सोसायटी, पश्चिम मंगळवार पेठ, अनुसूया कॉम्प्लेक्स (भवानी पेठ), वामननगर (जुळे सोलापूर), श्री साई अपार्टमेंट (होटगी रोड), स्वामीसमर्थ सोसायटी येथील रहिवासी आहेत.
या भागातील रहिवासी आहेत.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 422 असून एकूण मृतांची संख्या 380 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 1 हजार 107 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 935 इतकी आहे.