अट्टल मोटरसायकल चोराकडून चोरीच्या ५ मोटरसायकल जप्त,१ लाख ३० हजारचा मुददेमाल हस्तगत

0
281

अट्टल मोटरसायकल चोराकडून चोरीच्या ५ मोटर
सायकल जप्त, ₹ १ लाख ३० हजारचा मुददेमाल हस्तगत

बार्शी शहर पोलीसांची कामगिरी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

प्रतिनिधी | बार्शी

बार्शी शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी एका संशयितास पकडून त्याच्याकडून चोरीच्या ५ मोटारसायकली जप्त करून १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गोपाळ प्रभु चव्हाण वय २९ रा. गणेशगाव पाटी ता. माळशिरस असे अटक करण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे. त्यास दि ४ रोजी रात्री अटक करून दि ५ रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दि ९ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली होती. नंतर त्यास इंदापूर येथील गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, दि ४ ऑगस्ट रोजी बार्शी शहरामध्ये पेट्रोलिंग दरम्यान संशयीत बबन मोहन
चव्हाण रा. सिरसाव ता. परांडा जि.उस्मानाबाद यास त्याचेकडील काळया रंगाची सीबी शाईन मोटर
सायकल नंबर एम.एच. ४५ एसी ६२६८ याचेसह पकडून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल हि गणेशगाव पाटी ता. माळशिरस येथील त्याचे नातेवाईक गोपाळ प्रभु चव्हाण यांचेकडून १० हजार रु विकत घेतली असुन त्याचे कागदपत्रे लवकरच देतो असे
सांगितले.

सदर तपासामध्ये बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं.३६०/२०२१ भादवि कलम ३७९
मध्ये आरोपी नामे गोपाळ प्रभु चव्हाण वय २९ रा. गणेशगाव पाटी ता. माळशिरस यानेच
चोरली असण्याची शक्यता असल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करून सदर आरोपीस विश्वसात
घेवुन तपास केला असता त्याने माळशिरस, वेळापुर, टेंभुर्णी, इंदापुर येथुन मोटर सायकल चोरल्या
असुन त्या सिरसाय ता.परांडा व बेलगाव ता. बार्शी येथे प्रत्येकी १० हजार रू विकी केली असल्याचे सांगितले.

त्यावरून सिरसाव येथुन एक काळ्या रंगाची होंडा
कंपनीची सीबी शाईन मोटर सायकल (एम.एच. ४५ एसी ६२६८ ) , एक निळया काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो मोटर सायकल (एम.एच. २० एसी ६३९६) एक काळया रंगाची हिरो फॉशन प्रो मोटर सायकल (एम.एच. ४५ डब्ल्यु ८२३५), एक निळया काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्रो मोटर सायकल (एम.एच. ४५ एक्स ४९३४ )एक लाल काळया रंगाची बजाज कंपनी पल्सर मोटर सायकल (एम.एच. ४५पी ८८५७) असा एकुण १ लाख ३० हजार रू चा मुददेमाल हस्तगत केला.


पोलीस अधिक्षक तेजस्वी सातुपते, अपर पोलीस
अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धारशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहा. पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोलीस अमलदार ज्ञानेश्वर घोंगडे, फिरोज बारगिल, अर्जुन गोसावी, रवी लगदिवे, महेश जऱ्हाड, रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी सदरची कामगिरी केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here