बार्शी तालुक्यात शुक्रवारी सापडले ४७ रुग्ण; एक मयत

0
808

बार्शी तालुक्यात १६८ कोरोना ऍक्टिव्ह  रुग्ण

गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : बार्शी तालुक्यात मागील काही दिवसापासुन कोरोना बाधित रुग्ण कोरोनावर यशस्वी मात केल्याने बार्शी तालुक्यात कोरोनाने बाधित रुग्ण संख्या १६८ उरली आहे. तर शुक्रवार दि २१ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात ४७ रुग्णांची भर पडली आहे.


बार्शी तालुक्यात गेल्या महीन्यात झपाट्याने वाढत असलेला कोरोना सदया येत असलेली कोरोना बाधित रुग्ण संख्या व बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पाहता बार्शी शहरासह तालुक्यात कोराना अटोक्यात येत असल्याचे चित्र आहे .

बार्शी तालुक्यात आजवर १७४९ कोरोना बाधित रुग्ण सापडले मात्र त्यापैकी १४८१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी पणे मात केली तर आता फक्त १६८ अॅक्टीव रुग्ण तालुक्यात असुन तेही उपचार घेत आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत असला तरी सर्वांनी शासनाचे कोरोना विषयक नियम पाळले तर लवकरच बार्शी तालुका कोरोनामुक्त होईल.


बार्शी तालुक्यात ४७ रुग्णांची पडली भर

बार्शी शहर पोलिस स्टेशन व बार्शी स्टेट बॅकेत कोरोनाचा शिरकाव

बार्शी शहर व तालुक्यात प्राप्त अहवाला शहरात सर्वाधिक अलिपुर रोड ६ ,कसबा पेठ ६ ,व मंगळवार पेठ ३,  उपळाई रोड ३, सोलापुर रोड ३, रुग्ण सापडले आहेत तर  शहर पोलिस स्टेशन २, कासारवाडी रोड २, तुळजापुर रोड २ , जावळी प्लॉट १, स्टेट बॅक १, घोडके प्लॉट १,

जामगाव रोड १, गाडेगाव रोड १, सावळे गल्ली १ असे ३३ रुग्ण बधित सापडले तर ग्रामिणमध्ये खांडवी येथे सर्वाधिक ६ रुग्ण व  वैराग १, घारी १, आळजापुर १, येळंब १, उक्कडगाव २, गाताची वाडी १, शेंद्री १ असे १४ रुग्ण आढळले आहेत तर प्राप्त अहवलात १ मयत नोंद झालेने आजवर मयताची एकुण संख्या ७२ वर पोहचली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here