सोलापुर ग्रामीण जिल्ह्यात 434 ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण; वाचा कोणत्या तालुक्यात किती रुग्ण ते

0
569

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 434 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 257 पुरुष तर 177 महिलांचा समावेश होतो.


आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 314 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 4 पुरुषांचा आणि 1 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 2917 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2483 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 104 इतकी झाली आहे. यामध्ये 14,263 पुरुष तर 8841महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 633 जणांचा मृत्यू झाला आहे यात 441 पुरुष तर 192 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 227 आहे .यामध्ये 4 हजार 678 पुरुष तर 2549 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 15 हजार 244 यामध्ये 9941 पुरुष तर 6103 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 4 तर ग्रामीण 4

बार्शी –नागरी 44 तर ग्रामीण 26

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 0

माढा – नागरी 5 तर ग्रामीण 66

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 102

मंगळवेढा – नागरी 3 ,ग्रामीण 26

मोहोळ – नागरी 3 ग्रामीण 20

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 4

पंढरपूर – नागरी 18 ग्रामीण 60

सांगोला – नागरी 14 ग्रामीण 22

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 13

आजच्या नोंदी नुसार नागरी -91 तर ग्रामीण भागात 343 असे एकूण 434 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here