40 मुस्लीम कुटुंबांचा हिंदू धर्मात प्रवेश, औरंगजेबाच्या भीतीने पूर्वजांनी बदलला होता धर्म

0
135

40 मुस्लीम कुटुंबांचा हिंदू धर्मात प्रवेश, औरंगजेबाच्या भीतीने पूर्वजांनी बदलला होता धर्म

हरयाणाच्या हिसार येथील 40 मुस्लीम कुटुंबांनी धर्मपरिवर्तन केलं असून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या 80 वर्षीय दिवंगत नातेवाईक महिलेचे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हिसारमधील बीढमीरा या गावात ही कुटुंबं राहतात. या गावात मुस्लीम कुटुंबांमध्ये सर्व हिंदू प्रथा परंपरा पाळल्या जातात. फक्त अंत्यसंस्कार मुस्लीम पद्धतीने दफनविधी करून केला जातो. येथील 80 वर्षीय फुली देवी यांचं शुक्रवारी निधन झालं.

त्यांचा मुलगा सतबीर याने त्यांचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने व्हावेत असा विचार केला. मात्र, त्यासाठी हिंदू धर्म स्वीकारणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह तेथील चाळीस कुटुंबांतील 250 जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. या धर्मप्रवेशानंतर फुली देवी यांच्यावर हिंदू पद्धतीने दाहसंस्कार करण्यात आले.

सतबीर याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पूर्वज हिंदू होते. मात्र, मुगल बादशहा औरंगजेब याच्या दबावामुळे त्याच्या पूर्वजांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर अंत्यसंस्कार वगळता उर्वरित सर्व रितीरीवाज हे हिंदू पद्धतीने होत असत, अशी माहिती सतबीर याने दिली आहे. या मागे कोणाचाही दबाव किंवा जबरदस्ती नसून आम्ही स्वखुशीने हिंदू धर्मात प्रवेश केल्याचंही सतबीर यांचं म्हणणं आहे.