सोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण भागात 14 मृत्यू

0
495

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येसोबत मृत्यूचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल चौदा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना चाचणीचे 3 हजार 162 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 747 अहवाल निगेटिव्ह आले असून 415 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.ही माहिती बुधवारी सायंकाळी देण्यात आली.तर सोलापूर शहरात 46 कोरोना बधितांची वाढ झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 18 हजार 748 झाली आहे. ग्रामीण भागातील 531 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. रुग्णालयात सध्या 6 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू असून 11 हजार 838 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 234 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 103 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आजच्या अहवालातील मृत व्यक्तींमध्ये करमाळा तालुक्‍यातील केम येथील 76 वर्षीय महिला. पंढरपुरातील रोहिदास चौकातील 35 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव येथील 58 वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील संत पेठ मधील 69 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील खेड येथील 70 वर्षिय पुरुष,

बार्शीतील शिवाजीनगर येथील 77 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील देवडे येथील 60 वर्षीय महिला, बार्शी तालुक्‍यातील जामगाव येथील 55 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोड्डी येथील 55 वर्षीय महिला, सांगोला तालुक्‍यातील चिंचोली येथील 65 वर्षिय पुरुष,

मंगळवेढा तालुक्‍यातील गारनिकी येथील 70 वर्षिय महिला, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव येथील 50 वर्षीय महिला, माढ्यातील राजरतननगर येथील 55 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील रोपळे येथील 55 वर्षिय पुरुष अशा 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

सोलापूर शहर

शहरात आज नव्याने 46 रुग्णांची भर पडली असून आता कोरोना बाधितांची संख्या सात हजार 644 वर पोहचली आहे. त्यामध्ये चार हजार 481 पुरुषांचा तर, तीन हजार 161 महिलांचा समावेश आहे. शहरातील 301 पुरुष आणि 147 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत.

आज शहरात वैद्यकीय महिला वसतीगृह (होटगी रोड), राजस्व नगर, आदित्य नगर, इंदिरा नगर, राघवेंद्रनगर, जय जलराम नगर (विजयपूर रोड), पूर्व मंगळवार पेठ (कुंभार वेस), मंत्री चंडक विहार, गोंधळे वस्ती (भवानी पेठ), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स, उत्तर कसबा (पत्रा तालिमजवळ), दक्षिण कसबा, केगाव, शिवाजी नगर (बाळे), गुरूदेव दत्त नगर (जुळे सोलापूर),

अभिमानश्री नगर, रेल्वे लाईन (जुना एम्प्लॉयमेंट चौक), वैष्णवी पार्क (अक्‍कलकोट रोड), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), सुनिल नगर, भूषण नगर झोपडपट्टी क्र.दोन, शेटे नगर (दमाणी नगर परिसर), रामराज्य नगर आणि ऋषिकेश नगर (दहिटणे) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here