सोलापूर : सोलापूर शहरात आज एक हजार 295 संशयितांपैकी 39 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, मृतांची संख्या पुन्हा वाढू लागल्याची चिंता असून मृतांमध्ये 52, 57, 64 आणि 73 वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुवावेत, या त्रिसुत्रीचा वापर केल्यास कोरोनाचा धोका निश्चितपणे टाळता येऊ शकतो, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शहरातील 60 हजार 294 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
आज एक हजार 295 रिपोर्टमध्ये आढळले नवे 39 पॉझिटिव्ह
शहरातील 118 रुग्णांनी आज गाठले घर; एकूण पाच हजार 270 रुग्णांची कोरोनावर मात
मृतांची संख्या 412 ; आज चौघांचा कोरोनाने घेतला बळी
गदगी नगर (जुना विडी घरकूल), गांधी नगर, सोलापूर जेल, गंगा निवास, चंद्रकिरण अपार्टमेंट, विजय अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स), मंत्री चंडक रेसिडेन्सी, निर्मिती विहार (विजयपूर रोड), गोल्डफिंच पेठ (किल्ला बागेजवळ), यशवंत नगर, द्वारका नगरी, शिवयोगी नगर, ज्ञानेश्वर नगर (जुळे सोलापूर), भद्रावती पेठ, रंगराज नगर, दिक्षित नगर, श्रीराम नगर (नई जिंदगी), निता नगर (अक्कलकोट रोड), सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. सहा, हत्तुरे वस्ती, नवी पेठ, कल्याण नगर भाग-दोन,


ईश्वरी अपार्टमेंट (अशोक नगर), आयोध्या नगर (हैदराबाद रोड), नाथ प्लाझा (सात रस्ता), सोरेगाव, महाराणा झोपडपट्टी, बेडरपूल (लष्कर), गुलमोहर वसंत विहार, सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. एक, लक्ष्मी नारायण टॉकिजजवळ, आदित्य नगर, अशोक चौक, कविता नगर (पोलिस लाईन), साखर कारखान्याजवळ, काडादी नगर (होटगी रोड), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.
‘येथील’ चौघांचा झाला मृत्यू
अक्कलकोट रोडवरील नितीन नगरातील 64 वर्षीय पुरुषाचा, उत्तर कसब्यातील 73 वर्षीय महिलेचा, मुरारजी पेठेतील 52 वर्षीय, तर कुंभार गल्लीतील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने आज बळी घेतला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सर्व नियमांचे पालन करण्याची गरज आहे. सोलापुकरांनी या नियमांचे पालन केल्यानेच शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे पूर्वीचा गंभीर आजार असतानाही वेळेत त्याचे निदान होऊ न शकल्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही चित्र आहे.