बार्शी तालुक्यात दोन दिवसात आढळले 38 कोरोना रुग्ण
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. शुक्रवारी एका दिवसात 30 रुग्ण आढळून आल्यानंतर शनिवारी ही 8 रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही 188 झाली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


शुक्रवारी बार्शी शहरात 436 तर ग्रामीण भागात 797 अशा एकूण 1233 कोरोना अँटिजेंन आणि आरटिपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. आज 14 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. आजवर एकूण बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही 20375 झाली आहे.461जणांचा मृत्यू झाला आहे तर 19726 जण बरे झाले आहेत.