बार्शी तालुक्यात रविवारी आढळले ३६ कोरोना रुग्ण; एक मयत,एकूण आकडा 1270 वर
बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढतच असुन दररोज बाधित रुग्णांची भर पडत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणातही वाढ झाली आहे. रविवार दि. ९ रोजी आलेल्या अहवालात ३६ रुग्ण वाढले आहे तर ४६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.तर एक मयत झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग शहरासह तालुक्यात ग्रामिण भागातही बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आलेल्या अहवालात बार्शी शहरातील २३२ जणांचे रिपोर्ट आले असुन त्यापैकी २११ रिपोर्ट निगेटिव्ह आले तर मंगळवार पेठ ३, सनगर गल्ली ३, भीमनगर ३, गाडेगाव रोड ३, झाडबुके मैदान २ ,दत्तनगर १, आझाद चौक १,धर्माधिकारी प्लॉट १
कसबा पेठ १, वाणी प्लॉट १, हांडे गल्ली १, सोलापुर रोड १, असे २१ जण पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तरग्रामिणमधे २३४ जणांचे रिपोर्ट आले असुन त्यापैकी २१९ रिपोर्ट निगेटिव्ह आले तर चारे १, गाताचीवाडी १, कव्हे १, घारी ४, खामगाव १, पानगाव १, कांदलगाव १, उक्कडगाव १

,

धामणगाव दु १, सुर्डी ३ असे १५ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले . प्राप्त अहवालात एकुण ३६ रुग्ण वाढ झाल्याने तालुक्यात एकुण १२७० रुग्ण संख्या झाली आहे.

एकीकडे रुग्ण वाढ होत आहे तर दुसरीकडे कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.एकुण १२७० रुग्ण संख्यापैकी ८३० रुग्ण बरे झाले आहेत तर ३९५ जणांवर उपचार सुरु आहे .तर आज पर्यंत ४५ रुग्ण मयत झाले आहेत .